
जळगाव- ट्रकच्या धडकेत मोहाडी येथील दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही अपघात महामार्गावरील साकेगाव पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ५.२५ वाजता झाला.
सतीश साहेबराव सपकाळे (वय ३२) हा जळगाव एमआयडीसीतील ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये मेकॅनिकचे काम करीत होता. ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगसाठी तो भुसावळला गेलेला होता. तेथून दुचाकीने (एम.एच.१९ बी.४५९८) जळगावला परत येताना साकेगाव पुलालगत समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.
Post a Comment