0
भररात्री गार्डनमध्ये ऐकू आला तरुणीच्या रडण्याचा आवाज, घडलेच होते असे काही

चंदिगड - पाच दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय तरुणीला एका तरुणाने भुलवून चंदिगडला नेले. येथे त्याने तिला आपल्या खोलीत ठेवले आणि रेप केला. त्याच्या तावडीतून सुटून तरुणी कशीबशी पळून एका पार्कमध्ये आली. तेथे एका भल्या व्यक्तीने तिला पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी वुमन अँड चाइल्ड हेल्पलाइन 181ची मदत घेतली आणि तिच्याशी बोलले. तरुणीच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तीन आरोपींचा शोध सुरू...
- कलम 363- आमिष दाखवून किडनॅप करणे, कलम 363 वाईट हेतूने अपहरण- 376 (2) (जी) गँगरेप करणे, 376 (डी) सारखा-सारखा गँगरेप करणे तसेच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत प्रकरण दाखल झाले आहे.
- तरुणीला वुमन अँड चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने शेल्टर होममध्ये पाठवण्यात आले आहे.
- एका आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचे नाव सलमान ऊर्फ लक्की असे आहे. इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
- आरोपीने तिन्ही मित्रांकडून पैसे घेऊन बळजबरी शारीरिक संबंध बनवायला लावले का, या अँगलनेही पोलिस शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री अडीच वाजता एका पार्कमध्ये एकटीच रडत होती तरुणी...
- आरोपी 6 महिन्यांपासून पीडितेला ओळखत होता. तो परवाणू गावाचा असूनही फैदा गावात राहत होता.
- तरुणी चंदिगडमध्ये पहिल्यांदाच आली होती. तिला कुठे ठेवण्यात आले तेही नीट सांगता आले नाही. 
- तिने अंदाजे सांगितलेल्या लोकेशनवरून पोलिसांनी छडा लावला.
- सूत्रांनुसार, तिला एका गुरुद्वाऱ्याजवळ असलेल्या वस्तीमध्ये ठेवले होते, तेथून जवळच रेल्वे ट्रॅकही आहे.
- पोलिसांनी हेल्पलाइन आणि मुलीला घेऊन शहरभरात तशा दिसणाऱ्या 5 जागांवर शोध घेतला. शेवटी पोलिस फैदा गावात गेले, येथे त्यांना ती जागा मिळाली. येथे मुलीने त्या खोलीचीही ओळख पटवली.
आरोपीच्या खोलीत आढळली आणखी एक महिला...
- पोलिस जेव्हा आरोपीच्या खोलीपर्यंत पोहोचले, तेव्हा तेथे दुसरी एक महिला होती. तथापि, तिचा या प्रकरणात रोल होता वा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
काय म्हणाले पोलिस?
- गँगरेपची घटना घडली आहे. आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. तरुणीबाबत आम्ही सांगू शकत नाही, अजून तपास सुरू आहे.
- दीपक यादव, डीएसपी, साऊथ
आम्ही पीडितेसोबतच होतो. या केसमध्ये जर आमच्याकडून पोलिसांना कुठलीही मदत हवी असेल, आम्ही तयार आहोत. सोमवारी मुलीला आयोगापुढे नेण्यात आले. 

Post a Comment

 
Top