0
शनिवारी पाणीपुरवठा बंद; रविवारीही कमी दाबाने पाणी


नाशिक- शनिवारी(दि. ११) गंगापूर धरणाजवळील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीसह अन्य कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी महावितरण कंपनी विद्युत पुरवठा बंद ठेवणार असल्यामुळे महापालिका क्षेत्रात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार अाहे. रविवारीही कमी दाबाने पाणी येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले अाहे.

गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे मेन पॅनल ३.३ के. व्ही. केबल जोडणी, नाशिकरोड जलशुद्धिकरण केंद्र सबस्टेशन येथे सीटीपीटी बदलणे, सेटल वॉटर चॅलन लिकेज बंद करणे, निलगिरी बाग जलशुद्धिकरण केंद्र येथील निशांत व्हिलेज टाकी गोपाळनगर बूस्टर पंपिंग स्टेशन येथे रायझिंग मेनवर फेलो मीटर बसविणे, १२०० मिलिमीटर पीएससी जलवाहिनी १००० मिलिमीटर मुख्य जलवाहिनीची गळती बंद करणे, तसेच गांधीनगर जलशुद्धिकरण केंद्र येथे नवीन जलकुंभाचे क्राॅस कनेक्शन करणे अादी कामे करावयाची आहेत. त्यासाठी शनिवारी वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार अाहे. सकाळी वाजेनंतर संपूर्ण दिवसाचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी सकाळी दुपारचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल, अशी माहिती देण्यात अाली अाहे.

Post a Comment

 
Top