0
शरीर सुखास भावजायीने दिला नकार; चुलत दिराने डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

कोल्हापूर- शारीरिक सुखाच्या मागणीसाठी नकार दिल्याने चुलत दीराने डोक्यात दगड घालून भावजयीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी टेकडी परिसरात ही घटना घडली. राजाराम गुंडू कागले (वय- 42) असे आरोपीचे नाव आहे.
कागल पोलिसांनी आरोपी राजाराम गुंडू कागले याला गजाआड केले आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पी.आय.पाटील,भालके,कागल पोलीस, करवीर पोलीस ठाण्याचे डीबी कर्मचारी,सायबर सेल व कोल्हापूर एलसीबी, हातकणंगले पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

 
Top