
मुंबई : चारित्र्यावर संशय घेत एका इसमाने पत्नीवर अॅसिडहल्ला केल्याचा प्रकार मालवणीत घडला. या हल्ल्यात महिला ८० टक्के तर त्यांची पाच वर्षांची मुलगी २० टक्के भाजली आहे़ गुरुवारी मालवणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली़ त्याला शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे़
रेवाब अली (३०) असे या अटक इसमाचे नाव आहे. त्याची पत्नी झकीरा (२६) आणि मुलगी अफिफा (५) यांच्यासोबत तो मालवणीत राहतो. अॅसिडहल्ला केल्यानंतर अली मालवणी पोलीस ठाण्यात गेला़ झकीराने माझ्यावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला़ मात्र ते तिच्याच अंगावर पडले़ त्यात आमची मुलगीही भाजली, असे त्याने पोलिसांना सांगितले़ पोलिसांनी त्याला ठाण्यातच थांबण्यास सांगितले़ झकीराचा आवाज शेजाºयांनी ऐकला़ शेजारी घरात गेले तेव्हा त्यांना मायलेकी भाजलेल्या अवस्थेत दिसल्या़ दोघींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले़ डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली़ पोलिसांनी ठाण्यातच असलेल्या अलीला अटक केली़
Post a Comment