0
यवतमाळ: वणी ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांच्या नवजात बालकाची चोरी
यवतमाळ-वणी येथील ग्रामीण रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, रुग्णालयातून दोन दिवसांच्या नवजात बालकाची चोरी झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने रुग्णालयात जन्मलेल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे रुग्ण कल्याण समितीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, वणी रुग्णालयात नुसरत अब्दुल सत्तार (रजा नगर, हिंगणघाट) ही महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. रविवारी (5 नोव्हेंबर) तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास नुसरतच्या बिछाण्यावरून बाळाची चोरी झाली. सर्व झोपेत असताना हा प्रकार घडला. नुसरतला जाग आली तेव्हा रुग्णालयात एकच कल्लोळ माजला. शोधाशोध सुरू झाली परंतु बाळाचा थांगपत्ता लागला नाही. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून वणी येथून एका आरोपीला ताब्यात घेतले. बाळाच्या शोधात एक पथक रवाना केले.

नवजात बाळालाचा असा लागला शोध...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेले बाळ वणीपासून 200 किलोमीटरवर नेण्यात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिस पथक त्या ठिकाणी पोहोचले आहे. नवजात बाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकरणी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक वणी येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

Post a Comment

 
Top