

नवी दिल्ली - पाटीदार अनामत (आरक्षण) आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलचे कथित सेक्स व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वीही देशात अनेक स्कँडल्स घडलेले आहेत. सेक्स स्कँडलमुळे प्रतिष्ठा धुळीला जाणारा हार्दिक हा काही पहिला राजकीय नेता नाही. यापूर्वी असे अनेकांसोबत झाले आहे. देशातील अशाच गाजलेल्या खळबळजनक प्रकरणांची ही माहिती...
हार्दिक पटेलचे 4 व्हिडिओज झाले व्हायरल
- नव्या व्हिडिओमध्ये एक महिला बेडवर हार्दिकजवळ बसलेली दिसत आहे. त्यांच्याबरोबर आणखी दोन जणदेखील आहेत. तिघांनीही मुंडण केलेल दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक हॉटेलच्या रूममध्ये एका महिलेबरोबर असल्याचे दिसत आहे. यावर हार्दिकने घाणरडे राजकारण सुरू असल्याचे म्हटले होते. दरम्यान, हार्दिकच्या बचावात दलित नेता जिग्नेश मेवानी पुढे आले आहेत. ते म्हणाले, हार्दिक चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
व्हिडिओबाबत काय म्हणाले हार्दिक पटेल...
- मीदेखील हा व्हिडिओ पाहिला आहे. एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा प्रकारचे प्रयत्न होतच असतात.
- या लोकांनी राजकारणाची पातळी ओलांडली आहे. हेरगिरीची कामे करणारे हे लोक आहेत. वेब पोर्टलवर याधीच अशी स्टोरी येऊन गेली आहे. गुजरातच्या महिला आणि भगिनींना माझ्यावर विश्वास आहे.
- सत्तेच्या लालसेपोटी महिलांचा वापर केला जात आहे. आता महिलांना धमकावल्याची प्रकरणेही समोर येतील. मला याने फरक पडत नाही, मी समाजाच्या कामासाठी बाहेर पडलो आहे. विजय रूपाणी यांनी अहमद पटेलांवर आरोप केले, त्याचे पुढे काही झाले नाही तर आता हार्दिक पटेलच्या मागे लागले.
- आम्ही निधड्या छातीने भाजपच्या विरोधात लढत राहणार आहोत. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ दिला त्याने भाजप जॉइन केले आहे. मी आधीच म्हटले होते की, व्हिडिओ समोर येणार आहे. घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
Post a Comment