0

नाशिक : दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाºया तिघा सराईतांकडून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचे ५० मोबाईल जप्त केले आहेत़ विकी विजय भुजबळ ऊर्फ टेभ-या (रा़आशावाडी, ता़ दिंडोरी), राहुल भिकन कासार (राफ़ुलेनगर) व किरण मधुकर सोनवणे (रा़तपोवन,नाशिक) असे या चोरट्यांची नावे आहेत़
पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या कालावधीत रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे महागडे मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडल्या होत्या़ या चोरीच्या पार्श्वभूमीवर या तिघा सराईतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोनची चोरी केल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून नागरिकांचे चोरलेले अ‍ॅपल, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो या कंपन्यांचे महागडे ५० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़ पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेल्या मोबाईलची किंंमत अडीच लाख रुपये आहे़
पोलीस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव, सहायक पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार शेळके, पळशीकर, पोलीस नाईक वाघमारे, मरकड, शेळके, ठाकूर, जगदाळे, पोलीस शिपाई संगम, भोये यांनी ही कारवाई केली़

Post a Comment

 
Top