
मुंबई, 11 नोव्हेंबर : शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सिने अभिनेता शाहरूख खानला चांगलंच खडसावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शाहरूख खान त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी अलिबागच्या फार्महाऊसवर गेला होता. रात्रभर पार्टी साजरी करून सकाळी परत मुंबईला परत खासगी स्पीड बोटीने आला.
त्यावेळी 'गेट वे ऑफ इंडिया'च्या शेजारील जेट्टीला पोहचल्यावर शाहरूख खान लगेच जेट्टीवर न उतरता अर्धा तास बोटीत बसून सिगरेट पीत राहीला. त्यामुळे जेट्टीबाहेर बघ्यांची गर्दी वाढली. बघता बघता गर्दी एवढी वाढली की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नं निर्माण झाला. त्याचवेळी शेकापचे आमदार जयंत पाटील त्याच जेट्टीवरून अलिबागला जाण्यासाठी पोहचले. पण बघ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी त्यांच्यासह लोकांनाही मागे रेटले. या धक्काबूकीमुळे संतप्त झालेल्या जयंत पाटलांनी तिथल्या तिथेच शाहरुखला आपला आग्री हिसका दाखवला.
Post a Comment