0
घरातून परीक्षा देताना आकाश परब.

मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या आकाश परब या विद्यार्थ्याने वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाची परीक्षा घरातून दिली. मुंबई विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतली.
विद्यापीठाच्या नियमानुसार त्याला वाढीव एक तासही देण्यात आला.
भांडुपच्या रामानंद आर्य डीएव्ही महाविद्यालयात शिकणारा आकाश चेंगराचेंगरीत जखमी झाल्याने त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्‍यता होती. त्याने घरातून परीक्षा देण्याची विनंती विद्यापीठाकडे केली होती. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी त्याला तशी परवानगीही दिली होती. आजपासून बी.कॉम. द्वितीय वर्ष (सत्र तीन) चे आकाशचे पेपर सुरू झाले असून उर्वरित पेपरही त्याला त्याच्या घरात बसून लिहिता येतील, असे  विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. आकाशच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी त्याची केईएम रुग्णालयात भेटही घेतली होती.

Post a Comment

 
Top