
तामीळनाडूमधील चेन्नईबरोबरच किनार्याजवळील जिल्ह्यांना सलग पाच दिवस पडणार्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या २४ तासात २०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २०१५ नंतर सर्वात जास्त मोठ्या पावसाची नोंद या पाच दिवसामध्ये झाली आहे. कांचीपूर येथे ६२७ मि. मी. पाऊस झाला आहे. राज्यात एकूण १९३ मि. मी. पावसाची नोंद एका दिवसात झाली आहे.
या पावसामुळे तारांगामबाडी आणि सिरकाजी तालुक्यातील एक हजार घरे पाण्याखाली गेली आहेत. किनार्याजवळील गावांचा विद्युत पुरवठा पुर्णत: बंद करण्यात आला आहे. या पावसाचा सगळ्यात जास्त फटका दक्षिण चेन्नईला बसला आहे.
मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून गुरूवारपासून महत्वाच्या स्टेशनवरून रेल्वे व्यवस्था बंद करण्यात आल्या आहेत. हवामन खात्याने आणि दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्य सरकारतर्फे येथील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरग्रस्त भागामध्ये आपत्कालीन व्यवस्था कार्यरत ठेवण्यात आली आहे.
Post a Comment