
मालेगाव- भाजप कार्यालयाने नाेटबंदी समर्थनार्थ अायाेजित मेळाव्याचे व्हाॅट्सअॅप ग्रुप्सवर पाठविण्यात येत असलेल्या संदेशांत ग्रुप मालकीच्या वादातून अद्वय हिरे सुनील गायकवाड समर्थकांतील संदेशयुद्धाचे रूपांतर प्रत्यक्ष हाणामारीत झाले. गायकवाड समर्थकांनी दिलेल्या अाव्हानाला सामाेरे जात हिरे मंगळवारी (दि. ७) रात्री सटाणा नाका चाैकात गेल्याने गायकवाड समर्थकांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर हिरेंनी प्रथम पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, नंतर तक्रार मागे घेतली. हिरेंवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात अाले. त्यांची प्रकृती ठिक अाहे.
बुधवारी (दि. ८) भाजपचा नियाेजित कार्यक्रम हाेता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ७) भाजपच्या व्हाॅट्सअॅपवरील सर्वच ग्रुप्सवर काही तरुण कार्यकर्ते तसा मेसेज पाठवत हाेते. यापैकी हिरेंच्याही ग्रुपवर हा संदेश पडला. येथेच ग्रुप्सवर चॅटिंग वादविवाद सुरू झाले. यात हिरेंना काही तरुणांनी थेट अाव्हान दिले, असा हिरेंचा दावा अाहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर हिरे अापल्या काही समर्थकांना घेऊन गायकवाड यांचे निवासस्थान असलेल्या सटाणा नाका चाैकात कारने गेले. गाडीतून उतरताच त्यांनी सुनील गायकवाड यांना शिवीगाळ केली, असा अाराेप गायकवाड यांनी केला अाहे. हिरेंच्या या वर्तनाने चाैकातील तरुणांनी एकत्र येत त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी हिरेंबराेबर असलेले लाेक पसार झाले. असा प्रकार झाल्याचे गायकवाड यांचे म्हणणे अाहे. तर चाैकात काही २० ते २५ वयाेगटांतील तरुणांनी तुफान दगडफेक केल्याने अापल्या डाेक्याला दगड लागला. डाेके फुटून माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मी त्या ठिकाणाहून निघणेच याेग्य समजले, असे हिरेंनी म्हटले अाहे. यानंतर हिरेंनी सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. डाॅक्टरांच्या परवानगीने त्यांना अधिक उपचारांसाठी सटाणाराेडवरील सनराइज रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. बुधवारी (दि. ८) सकाळी वाजेच्या सुमारास उपचारांनंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली. दरम्यान, हिरे छावणी पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पाेलिस निरीक्षक नव्हते. तसेच अपर पाेलिस अधीक्षकांचा माेबाइल बंद हाेता. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्री दादा भुसे यांना काॅल करून या प्रकाराची माहिती दिल्याचे पत्रकारांशी बाेलताना सांगितले. पाेलिस अधिकारी नाहीत, डाॅक्टर जागेवर नाहीत त्यामुळे स्थानिक अामदार म्हणून भुसेंना काॅल केल्याचे हिरेंनी म्हटले अाहे. या घटनेची माहिती तालुक्यात समजताच सकाळपासून हिरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली हाेती.
शिविगाळ अाव्हान
अद्वयिहरे यांनी व्हाॅट्सअॅप ग्रुपवर अाक्षेपार्ह भाषेचा प्रयाेग केला. बंगल्यावर या असे अाव्हान कार्यकर्त्यांना दिले. तरीदेखील मी दुर्लक्ष करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली हाेती. परंतु, हिरे यांनी थेट घरासमाेर चाैकात येऊन शिवीगाळ केली. यावेळी येथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. गाेंधळाचा अावाज अाला. काय झाले ते चाैकात पाहण्यासाठी अाम्ही येईपर्यंत हिरे येथून निघून गेले हाेते. यासंदर्भात पक्षाने अहवाल मागितला तर ताे पाठवू.
-सुनील गायकवाड, भाजप, मालेगाव महानगर अध्यक्ष.
शांततेसाठी प्रयत्न
अद्वयिहरेयांचा काॅल अाला हाेता. तेव्हा ते पाेलिस ठाण्यात हाेते. त्यांचे सगळे म्हणणे एेकून घेतले. शहर, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी भांडण मिटवणे हे माझे काम अाहे. परंतु, प्रथम त्यांच्यावर उपचार करावेत, यासाठी त्यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशाेकअण्णा बच्छाव यांना अापण अद्वय यांना किती लागले ते पहा अन् त्यांना अाधी रुग्णालयात घेऊन जा अशी विनंती केली. भांडणांचे काय ते नंतर पाहू, असे सांगितले.
- दादा भुसे, राज्यमंत्री शिवसेना नेते.
अाव्हान स्वीकारले
मला चाैकात येण्याचे अाव्हान दिले गेल्याने ते स्वीकारून मी गेलाे हाेताे. दगडफेक करणारे २० ते २५ वयाेगटातील तरुण हाेते. त्यांनी राजकीय लाेकांच्या अामिषाला बळी पडून हे कृत्य केले. पाेलिसांत तक्रारीमुळे त्यांचे भविष्य खराब झाले असते. जे लाेक बेकायदा व्यवसाय करतात, पक्षाच्या नावाने तयार कार्यालयात जुगार चालवतात, कार्यकर्त्यांना वापरून वाऱ्यावर साेडतात. या तक्रारी मी पक्षाकडे केल्या तर काय चुकीचे केले? तालुक्यात माझ्यावर प्रेम करणारा माेठा वर्ग अाहे. त्यांचा उद्रेक झाला तर माझा नाइलाज हाेईल.
-अद्वय हिरे, भाजप नेते
Post a Comment