0

manushi chillar wants to work with aamir khan in bollywood
नवी दिल्ली : तब्बल 17 वर्षानंतर मिस वर्ल्डचा किताब भारताला मिळवून देणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. कारण, बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास अवडेल यावर तिने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मानुषीने बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम करायला आवडेल असं स्पष्ट केलं आहे.
मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर नुकतीच मायदेशी परतली. यावेळी तिला तिच्या फ्यूचर प्लॅनविषयी विचारले असता, आपण डॉक्टर होणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच सध्या आपण अभ्यासावरच फोकस ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
पण आज तिने मुंबईत येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तिने आपल्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
बॉलिवूडमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता मानुषी म्हणाली की, “जर मला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास,  ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानसोबत काम करणं पसंत करेन.”
आमीरसोबत काम करण्यासंदर्भात तिने दोन मुख्य कारणं सांगितली. यातील पहिलं म्हणजे, आमीर खानचे सिनेमे अतिशय आव्हानात्मक असतात. तसेच त्यांच्या प्रत्येक सिनेमातून काही ना काही सामाजिक संदेश नक्कीच असतो.
याशिवाय, तिला बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्रीचं काम सर्वाधिक आवडतं? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने आपल्याला ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा अभिनय सर्वाधिक आवडत असल्याचं तिने सांगितलं.

Post a Comment

 
Top