0
...आणि विराटने सचिनचे पाय धरले

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज ५ नोव्हेंबर ला आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. टीम इंडियाच्या प्लेअर्सनी नुकतेच याचे जोरदार सेलिब्रेशनही केले. दरम्यान विराट आणि सचिनच्या एका मजेशीर आठवणीला उजाळा मिळाला आहे. 
जेव्हा विराट टीम इंडियामध्ये नवीन होता तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळी त्याने मास्टर ब्लास्टर तेंडुलकरसोबतच्या पहिल्या भेटीत त्याचे पाय धरले होते. विराट कोहलीने गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात हा सविस्तर किस्सा सांगितला आहे.
सचिन तेंडुलकरला भेटावे अशी विराटची इच्छा होती. संघातील एक-दोन खेळाडूंना त्याने ही इच्छा बोलून दाखविली होती. सचिनला भेटण्याआधी विराटला थोडी भीतीही वाटत होती. याचा फायदा घेत काही खेळाडूंनी विराटची मस्करी करायचे ठरविले. यासाठी एक प्लान तयार झाला. 
  
काही टीम मेंम्बर्सनी विराटला सांगितले की 'जो कुणी संघात नवीन येतो तो सचिनचे पाय धरतो आणि दर्शन घेतो'. विराटला ही गोष्ट खरी वाटली. आपल्या पहिल्या भेटीदरम्यान त्याने सचिनचे पाय धरले.
 तेव्हा सचिन म्हणाला, 'हे काय करतोयस ?' त्यावेळी विराट म्हणाला,   " पाजी मला संघातील खेळाडूंनी सांगितले आहे की भारतीय संघात नवीन आले की पहिले आपले दर्शन घ्यावे लागते. " यावर सचिनही हसला आणि त्याने विराटचा गैरसमज दूर केला. तसेच संघातील खेळाडू त्याची गंमत करत होते.

विराट तोडेल रेकॉर्ड

 क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला निवृती घेताना तुझा रेकॉर्ड कोण तोडू शकेल ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सचिनने विराट कोहलीचे नाव घेतले होते. 

Post a Comment

 
Top