0


 मुंबई:- १९ वर्षांखालील एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रविरोधात खेळताना मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिने तडाखेबंद द्विशतक झळकावले आहे. तिने अवघ्या १६३ चेंडूंमध्ये २०२ धावा ठोकून नवा विक्रम केला आहे. तिचे या स्पर्धेतील दुसरे शतक आहे. याआधी स्मृती मंधाना हिने द्विशतक झळकावले होते.

औरंगाबादमधील एडीसीए मैदानावर ही लढत झाली. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये २ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्जने आक्रमक खेळी करत स्पर्धेतील पहिले द्विशतक ठोकले. तिने १६३ चेंडूंमध्ये नाबाद २०२ धावा फटाकावल्या. त्यात २१ चौकारांचा समावेश आहे. तिला सेजल राऊतने चांगली साथ दिली. तिने ११४ चेंडूंत ९८ धावा कुटल्या. १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेत द्विशतक झळकावणारी जेमिमा ही दुसरीच महिला खेळाडू ठरली. याआधी २०१३ मध्ये स्मृती मंधानाने नाबाद २२४ धावा केल्या होत्या. दरम्यान, मुंबईने ३४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला सौराष्ट्राचा डाव अवघ्या ६२ धावांत गडगडला.

Post a Comment

 
Top