0
अपघातग्रस्तांच्या मदतीला  धावले शरद पवार; नागपूर-गडचिरोली रस्त्यावर अपघात

नागपूर - नागपूरहून गडचिरोलीकडे जाताना भिवापूरजवळील रस्त्यावर अपघात झाल्याचे पाहताच वाहनांचा ताफा थांबवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका कारने टिप्परला मागून धडक दिली होती. त्यामुळे कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे आतील जखमींना बाहेर येता येत नव्हते. रस्त्याने जाताना ही दुर्घटना पाहून पवार थांबले. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले. तसेच तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका बाेलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात अाले. पवारांसोबत या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार रमेश बंग होते. यानंतरच त्यांच्या वाहनांचा ताफा गडचिरोलीकडे मार्गस्थ झाला.

Post a Comment

 
Top