0
इस्राईलच्या सहकार्याने भारताचा चीन, पाकला दणका

नवी दिल्ली : भारताने जबरदस्त खेळी करत एकाच दणक्यात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.

चीन आणि पाकिस्तान हे भारताचे शेजारी. एरवी भौगोलिक रचनेमुळे काहीसा अजातशत्रू असलेल्या भारताला चीन आणि पाकिस्तान सतत पाण्यात पाहतात. कधी डोकलामसारख्या मुद्द्यावरून चीन तर, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पाठवून पाकिस्तानत तर, सततच भ्याड कृत्ये करत असतो. भारत कष्टाच्या जोरावर विकास करतो आहे. त्यामुळे त्याला अडवता येत नाही. त्यामुळे युद्धखोरीची भाषा करून भारताला सतत डिवचत रहायचे. जेणेकरून भारताची सर्वाधीक ताकद संरक्षणावर खर्च होईल आणि आपसुकच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल, अशी उभय देशांची चाल. भारतालाही युद्ध करणे अवघड नाही. पण, देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलेला हा देश काहीसा युद्धाकडे आणि चीन, पाकिस्तानच्या अडेलतट्टूपणाकडे दुर्लक्षच करतो.
दरम्यान, भारताने चीन आणि पाकिस्तानला खिंडीत गाठण्यासाठी इस्राईलसोबत हातमिळवणी केली. आता भारत आणि इस्राईलचे लष्कर एकत्र युद्धाभ्यासही करणार आहेत. इतकेच नव्हे तर, या अभ्यासासाठी भारताचा सी-१३० जे सुपर हारक्यूलस एअरक्राफ्टसह ४५ सैनिकांचा ताफाही इस्राईलकडे रवाणा झाला. या ताफ्यात गरूड कमांडोंचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, यात भारतीय हवाई दल इस्राईलमध्ये 'ब्लू फ्लॅग - १७' मध्ये सहभागी होईल. २ ते १६ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या युद्धाभ्यासात भारत इस्राईल यांच्यासोबतच अमेरिका, फ्रांन्स आणि जर्मनीचे सैन्यही सहभागी होणार आहे.
दरम्यान, भारताच्या या खेळीने चीन आणि पाकिस्तानचा मात्र तिळपापड झाला आहे.

Post a Comment

 
Top