0
परीक्षेत जीन्स घालून जाणे पडले महागात

कानपूर : कानपूर जिल्ह्यातील सिकंदरा भागात एक धक्कादायक घटना समोर आलीये. परीक्षेदरम्यान युनिफॉर्मच्या जागी जीन्स घालून येणे एका विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले. 
स्कूल मॅनेजरने कात्रीच्या सहाय्याने विद्यार्थ्याची जीन्स कापली. यावेळी त्याच्या पायालाही गंभीर जखम झाली. 
सिकंदरा भागात राहणारा १७ वर्षीय मुलगा डॉक्टर आंबेडकर इंटर कॉलेजमध्ये ११वीत शिकतो. गुरुवारी त्याची सहामाही परीक्षा होती. यावेळी परीक्षेसाठी तो युनिफॉर्मच्या ऐवजी जीन्स घालून गेला. 
हे पाहताच स्कूल मॅनेजरने कात्रीच्या सहाय्याने पँट कापली यावेळी विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर जखमाही झाल्या. तसेच याबाबत आपले नाव घेतल्यास शाळेतून काढण्याची धमकीही स्कूल मॅनेजरने दिली. पिडीत विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. 

Post a Comment

 
Top