
मुंबई- आज भल्या पहाटे मुंबईत वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या एका डब्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यानंतर ही आग शेजारील डब्याला लागली. मात्र, मोनोरेलमध्ये प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनाने तातडीने पावले उचलत याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने ही आग काही मिनिटांत आटोक्यात आली.
या आगीत मोनोरेलच्या दोन्ही डब्यांचे नुकसान झाले आहे. हे डब्बे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे आज दिवसभर दुरुस्तीसाठी मोनोरेल सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. मोनोरेल ही सेवा सरकारसाठी पांढरा हत्ती ठरू लागला आहे.
Post a Comment