0
तरुणी सोडा-सोडा म्हणत होती, दोघे इथे-तिथे हात लावत होते; जोरात ओरडल्याने घडले असे काही

इंदूर -येथे इंद्रनगर परिसरात बर्थडे पार्टीच्या बहाण्याने मुंबईच्या इव्हेंट मॅनेजर तरुणीवर दोन मित्रांनी बलात्काराचा प्रयत्न केला. रात्री सुरू असलेल्या पार्टीदरम्यान आसपासच्या लोकांना अचानक तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अश्लील कृत्य करणे आणि बलात्काराचा प्रयत्न करणे असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण
मल्हारगंज पोलिसांतील टीआय पवन सिंघल म्हणाले की, गुरुवारी रात्री इंद्रनगरच्या रहिवाशांनी माहिती दिली होती की, येथे एका फ्लॅटमधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. यानंतर पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
- तेथे दोन तरुण एका तरुणीशी अश्लील चाळे करत होते. तरुणी म्हणाली की, ती इव्हेंट मॅनेजर आहे. मुलांनी बर्थडे पार्टी ऑर्गनाइज करण्यासाठी बोलावले होते. पार्टीदरम्यान यातील एकाने कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळून तिला दिली होती.
- थोड्या वेळाने दोन्ही आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करायला लागले. त्यांचा इरादा पाहून मी त्यांना विरोध केला, पण त्यांनी ऐकले नाही. मी त्यांना सोडा-सोडा म्हणत होते, पण ते मला इथे-तिथे हात लावत होते. यानंतर मी जोरजोरात किंचाळू लागले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाळ आणि प्रशांतला ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाले पोलिस
- सूत्रांनुसार, हा फ्लॅट किशोर नावाच्या व्यक्तीचा आहे. तो गोपाळचा मित्र आहे. पोलिस याप्रकरणी किशोरचीही चौकशी करणार आहेत. पोलिस म्हणाले, तरुणी छोटी ग्वालटोली येथील राहणारी असून ती इव्हेंटच्या कामानिमित्त बहुतांश मुंबईतच राहते. आरोपी गोपाल एका साडीच्या शोरूममध्ये काम करतो, तर दुसरा आरोपी प्रशांत नगरपालिकेत काम करतो.


Post a Comment

 
Top