
प्रसिद्ध टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबीताची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ताने देखील आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आहे.
मुनमुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहीलंय की तिचे शिक्षक आणि काकांनी तिचं शारीरिक शोषण केलं होतं. ती म्हणते, 'मी जे लिहितेय ते लहानपणी घडलं तेव्हा अश्रू आवरायचे नाहीत. माझ्या शेजारचे काका मला संधी मिळताच बळजबरीने मिठी मारायचे आणि कोणाला सांगू नको असं बजावायचे. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा असणारा एक चुलत भाऊ मला वाईट नजरेने बघायचा. इतकंच नव्हे तर माझ्या जन्माच्या वेळी जे डॉक्टर होते, त्यांनीही मी १३ वर्षांची झाल्यावर एकदा मला गलिच्छ स्पर्श केला होता.'
मुनमुनने तिच्या शाळेतला सांगितलेला किस्सा तर अत्यंत घृणास्पद आहे. ती लिहीते, 'माझे एक शिक्षक होते. त्यांनी मी राखी बांधायची. ते वर्गात मुलींची ब्रा ओढून त्यांना ओरडायचे आणि छातीवर मारायचे.' आपण वयाने लहान असतो आणि कुणाला काही सांगायला घाबरतो. घरातल्यांना आपलं म्हणणं कसं सांगायचं हे माहित नसतं म्हणून हे सर्व होतं, असंही मुनमुन सांगते. 'मला तेव्हापासून पुरुषांविषयी तिरस्कार वाटू लागला,' असंही ती म्हणते.
Post a Comment