
तिरुवअनंतपुरम : टीम इंडियाने थिरुवनंतरपुरममधल्या आठ-आठ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव केला. तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडवर मात केली.
कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पत्रकार परिषदेत घेतली. विजयाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मात्र या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाने विराटला संताप अनावर झाला. धोनीच्या संघातील समावेशाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला होता.
विराट भडकला
लोक धोनीवरच टीका का करतात समजत नाही. मी 3 सामन्यात धावा केल्या नाही तर मला कुणीही काही बोलणार नाही, कारण मी 35 वर्षांचा नाही. मात्र त्याच्यासोबतच असं का? राजकोटमध्ये परिस्थिती अशी होती, की जर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला असता तर तोही धावा करु शकला नसता. धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दात विराटने सुनावलं.
Post a Comment