0
Aishwarya Rai Bachchan’s Fanney Khan to clash with Salman Khan’s Race 3 on Eid 2018 latest update

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांसाठी नव्या सिनेमाची पर्वणी घेऊन येतो. ईदला सल्लूचा सिनेमा ही जणू परंपराच झाली आहे. बॉक्स ऑफिसवर सलमानशी टक्कर घेण्याचं धाडस सहसा कोणी मोठा स्टार करत नाही. मात्र खुद्द ऐश्वर्याने हा पंगा घेतला आहे.
सलमानने ‘रेस 3’ चित्रपटासाठी 2018 मधली ईद राखून ठेवली आहे. 15 जून 2018 रोजी रेस 3 प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड अर्थात ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फॅनी खान’ही त्याच दिवशी प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत.
2002 मधल्या ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर राखलं होतं, मात्र आता एकाच दिवशी दोघांचे सिनेमे रीलिज झाले, तर चर्चा तर होणारच!
फॅनी खानमध्ये ऐश्वर्यासोबत अनिल कपूर झळकणार आहे. निर्मात्यांनी दोघांसोबत चर्चा करुनच रीलिजची तारीख निश्चित केली. सणासुदीला चित्रपट प्रदर्शित होत असल्याने दोघंही खुशच होते. अनिल साकारत असलेली फॅनी खान ही व्यक्तिरेखा मुस्लिम असल्यामुळे ईदशिवाय दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही, असं निर्मात्यांनी सांगितलं.



Post a Comment

 
Top