0
भारतीय क्रिकेट संघ राजकोटमध्ये दाखल

राजकोट : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटमध्ये दाखल झालाय. यावेळी राजकोटमध्ये क्रिकेट संघाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 
यावेळी टीम इंडियातील काही खेळाडू नमस्ते करत असतानाचा एक फोटो भारतीय क्रिकेट संघाने सोशल मीडियावर शेअर केलाय. यात हार्दिक पटेल आणि अक्षर पटेल नमस्ते करत आहेत. 
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना राजकोटमध्ये होतोय. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघ नक्कीच करेल. 
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने शानदार कामगिरी करत मालिका जिंकली. त्यानंतर टी-२० मालिकेतही विजय मिळवण्यासाठी भारत सज्ज झालाय. 

Post a Comment

 
Top