0
रोडरोमीयोने आधी केली छेडछाड, नंतर तरूणीसोबत केले असे काही

हमीरपूर- येथे सोमवारी सकाळी कोचिंग क्लासमध्ये जात असलेल्या तरूणीला एका व्यक्तीने पकडले, यावरून संतापलेल्या तरूणीने त्याच्या कानशीळात वाजवली. नंतर त्या व्यक्तीने तिच्या मागील भागावर लात मारली आणि तिला मारहाण केली. हे पाहून घटनास्थली उपस्थित असलेल्या लोकांनी तरूणाची येथेच्च धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने आपण भाजप आमदार अशोक सिंह चंदेल यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले.

तरूणीने सांगितले- सतत करत होता छेडछाड...
- सदर घटना एसपी ऑफिसपासून काही अंतरावरील विद्यामंदिर रोडवर घडली.
- बंगाली कॉलनीत राहणारी बीएसस्सीची विद्यार्थीनी सोमवारी कोचिंग क्लाससाठी जात होती. रस्त्यात जगभान सिंह ने तिला मागून पकडले. त्यामुळे विद्यार्थीनीने त्याच्या कानशीलात लागवली.
- यावरून, रागवलेल्या जगभानने तिच्या पार्श्वभागावर लाथ मारली, यामुळे ती जमिनीवर पडली आणि तिच्या पोटाला दुखापत झाली.
- तरूणाच्या या कृत्याकडे पाहून तेथे उपस्थित लोकांनी त्याला चांगला चोप दिला. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
- स्थानिक लोकांनी सांगितले की, तो तरूण नेहमी कोचिंगसाठी जाणाऱ्या मुलींसोबत छेडछाड करत होता.
- तरूणींने पोलिसांना सांगितले की, तो तरूण गेल्या एका वर्षापासून तिच्या मागे पडला आहे. रोज तिच्यासोबत छेडछाड करत होता.

म्हणाला आमदार आहेत माझे मामा...
- चौकशी करणारे पोलिस अधिकारी ए के सिंह आरोपी जवळ पोहोचताच जगभानने त्यांच्ये पाय धरले आणि आपण निर्दोष असल्याचे सांगू लागला.
- त्याने सांगितले की तो हमीरपूर येथे राहतो आणि सकाळी आपले नातेवाईक असलेले आमदार अशोक सिंह चंदेल यांना भेटण्यासाठी गेला होता. 
- परत येताना मुलीने त्याला दोन चापटा मारल्या त्यामुळे त्याने रागाच्या भरात तिच्यावर हात उचलला.

Post a Comment

 
Top