0
मुलगी म्हणाली, प्लीज पप्पांपासून वाचवा, रात्री बेडवर येऊन करतात असे काही

इंदूर-स्वत:च्याच मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या नराधम बापाला एमआयजी पोलिसांनी अटक केली आहे. बापाच्या तावडितून आपली सुटका करून पोलिसांत धाव घेतलेल्या तरूणीने बापाचे कृत्य सांगून मदतीची याचना केली तेव्हा पोलिसही हैराण झाले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाला ताब्यात घेतले असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
- एमआयजी पोलिस ठाण्याच्या एसआय अनुराधा शर्मा यांनी सागितले की, रविवारी पोलिस ठाण्यात एक मुलगी आली होती. ती अतिशय घाबरलेली दिसत होती. तिची अवस्था पाहून टीआय़ने माझ्याकडे पाठवले. मी तिची विचारपूस केली तेव्हा ती बराच वेळ गप्प बसलेली होती, नंतर मी विश्वासात घेऊन सुरक्षेची हमी दिली तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
- तिने सांगितले की, ती 10 वीची विद्यार्थीनी आहे आणि घरात आपली आई-वडिल आणि भावासोबत राहते. तिने सांगितले की, तिचे वडिल तिला अश्लिल पद्धतीने टच करत करतात, भीतीपोटी तिने कोणालाच याविषयी सांगितले नाही. परंतु, रात्री त्याने बाप-लेकीच्या नात्यातील सर्व हद्दी पार केल्या. ती आपल्या छोट्या भावासोबत झोपलेली होती. रात्री 2 वाजेच्या दरम्यान बाप तिच्या बेडवर येऊन झोपला आणि अश्लिल पद्धतिने तिला टच करू लागला.
- त्याचा अशा टच करण्याने मुलगी जागी झाली, तिने बापाला विरोध केला तेव्हा तो तिला भीती दाखवू लागला. त्यानंतर तिने आईला जाऊन सर्व काही सांगितले. तेव्हा आरोपी बाप घरातून पळून गेला. यानंतर पीडित तरूणीने आईसोबत पोलिस ठाण्यात येऊन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांतगितला.
- पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, तेव्हा तो आपल्याच कॉलनीत आढळून आला. केस दाखल करून पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपी दारूडा असून दिवसभर नशेत असतो, तसेच परिसरातील लोकाना दारू पिऊन त्रास देतो. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हाही तो पिलेला होता. पोलिस त्याच्याशी विचारपूस करत आहे.

Post a Comment

 
Top