0
महापालिका बजेट एकमताने, तरी भाजपने विश्वासघात केला -प्रणिती शिंदे

सोलापूर-महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी त्यांच्या दोन मंत्र्यांमधील वादामुळे शहर विकासावर परिणाम झाला आहे. आम्ही शहर विकासासाठी महापालिका बजेटमध्ये एकमताने ठराव केला. पण त्यानुसार अद्याप निधी दिला नाही. असे करून भाजपने आमचा विश्वासघात केला. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनीच लढवावी, असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. महापालिकेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नोटबंदी, महापालिकेचे कामकाज, सत्ताधाऱ्यांचे अपयश, डेंग्यूबाबत महापालिकेची निक्रियता याबाबत टीका केली.

महापालिकेत स्थापत्य समितीच्या कार्यालयास आमदार शिंदे यांनी भेट दिली. त्यांचे स्वागत मनपा गटनेते चेतन नरोटे, स्थापत्य समिती सभापती विनोद भोसले यांनी केले. या वेळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वालेंसह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. आज शहरात जी कामे होत आहेत, ती आमच्या सरकारच्या काळातील आहेत. वैशिष्टपूर्ण योजनेतून कामे सुरू आहेत. शहर विकासासाठी आम्ही महापालिका बजेट एकमताने केले, त्यानुसार निधी दिला नाही. ५० टक्के निधी आम्हास मान्य नाही. भाजपने आमचा आणि जनतेचा विश्वासघात केला.

दोन मंत्र्यांमधील वादामुळे विकास थांबला
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, नोटबंदीला वर्षपूर्ती झाली, हा लोकशाहीला कलंक आहे. या नोटबंदीमुळे अनेकांचा रोजगारही बंद पडला. काम कमी झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील वादामुळे शहर विकास थांबला आहे. या गटबाजीचा फायदा प्रशासनातले अधिकारी घेत आहेत. या गटबाजीचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यांच्यातील वाद शहर विकासावर परिणामकारक ठरणार आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत नाही. कचऱ्याचा प्रश्न रखडलेला आहे. धुरावणी होत नाही. महापालिकेत नागरिकांची कामे होत नाहीत. डेंग्यूबाबत महापालिकेला गांभीर्य नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीत अधिकारी खोटी माहिती देतात.

सुशीलकुमार शिंदेंनी लढवावी लोकसभा
आगामीलोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक नाही. मला इतर पक्षांकडून निवडणूक लढवण्याची आॅफर नाही. मला काही राजकीय पक्षाने त्रयस्ताकडून विचारणा केली. पण मी काँग्रेससोबत राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांनीच लढवावी, असे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.

केवळ २० हजार कोटींची घोषणाच
यापुढेमहापालिकेत सर्व विरोधीपक्ष एकत्र राहून कामकाज करू, असे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले. शहरात २० हजार कोटींच्या कामाचा शुभारंभ दोन वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांचे दगड आजही रोवले नाहीत.

Post a Comment

 
Top