0

पलुस तालुक्यातील आमणापूर येथील क्रष्णाकाठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्त दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले . यावेळी पणत्या तून साकारलेला स्वस्तिक गणेश आकर्षणाचे केंद्र होता.
या निमित्ताने  गेला आठवडाभर गावातील सेवाभावी तरूणांकडून  घाटाची  स्वच्छता मोहिम सुरू आहे. सायंकाळी या घाटावर रांगोळी काढून शेकडो दिव्यांनी उजळून निघाला.
हा नयनरम्य दिपोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांची कृष्णाकाठावर मोठी गर्दी होती.
या दिपोत्सव कार्यक्रमाचे हे सतरावे वर्ष असून गावातील तरूणाई या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.
मी संदीप नाझरे, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, पलुस

Post a Comment

 
Top