जळगाव-जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात मद्यधुंद निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेड काढली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करीत वीट उचलून मारण्याचा प्रयत्न केला.
संतप्त झालेल्या त्या तरुणीनेही दगड उचलून त्याला मारल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकाराबाबत जिल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप तिने केला असून मंगळवारी तिने काही महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने एका कारमध्ये निलंबित कर्मचाऱ्यास पकडून आणून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरीला धक्का दिला असता तर तिने स्माइल दिले असते,असे हा निलंबित पोलिस निर्लज्जपणे या वेळी म्हणाला हे विशेष. या वेळी तिच्यासह महिलांनी पोलिसांवर संताप व्यक्त करीत आरोप केले.
पोलिस कॉन्स्टेबल युवती रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात रजेचा अर्ज देण्यासाठी गेलेली होती. त्या वेळी रात्री ते वाजेदरम्यान गोपाल रामचंद्र सोनवणे हा निलंबित पोलिस मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. सोनवणे याने धक्का देत त्या महिला सहकाऱ्याची छेड काढली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने शिवीगाळ करीत तेथे असलेली वीट उचलून महिला कर्मचाऱ्यास मारण्याचा प्रयत्न केला. छेड काढून पुन्हा मारण्यास उठल्यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यानेही दगड उचलून त्याला मारला. त्यानंतर तक्रार देण्यासाठी महिला कर्मचारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आली. तेथे सोनवणे याच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दिला. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्याने केला. पोलिसांनी मला रात्री ते ११ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. उलट तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले, असे ती म्हणाली.
बायकोने सोनवणेला सोडले जिल्हापेठ पोलिसांच्या हवाली
सोनवणेच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आहेत. निलंबित झाल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. निलंबित असूनही तो पोलिस अधीक्षक कार्यालयात वावरत असतो. पोलिसांना जेवण मागतो. पोलिसही त्याला खायला नाश्ता देतात. तुमचा कर्मचारी सांभाळा, असे म्हणून सोनवणेच्या पत्नीने त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणून सोडले होते. ती सुद्धा कंटाळून त्याला सोडून निघून गेली आहे. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. तो घरात एकटाच राहत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी दिली.

Post a Comment