0

सचिन तेंडुलकरला घडवणार्‍या आचरेकर सरांनाही भारतरत्न द्यावा- विनोद कांबळी

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न'चा सन्मान मिळाला, तो रमाकांत आचरेकर सरांमुळेच. असे सांगत माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने एक वेगळी मागणी केली आहे. ती म्हणजे रमाकांत आचरेकर यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत कांबळीने सिंधुदुर्ग येथे व्यक्त केले आहे.

कांबळी म्हणाला की, मुंबईतल्या भेंडीबाजार जन्म झाला. गल्ली क्रिकेट खेळलो. बाऊंड्री मारायचो तेव्हा बॉल अर्धा कापून यायचा. बॉल कुणाच्या कालवणात जायचा तर कुणाच्या बिर्याणीत पडायचा. मात्र आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्यांनी आम्हाला घडवले, अशा शब्दात त्याने आपल्या गुरुंचे ऋण व्यक्त केले.

आचरेकर सरांमुळेच सचिनला ‘भारतरत्न’

आचरेकर सरांमुळेच सचिनला ‘भारतरत्न’ हा सगळ्यात मोठा मान मिळाला. आचरेकर सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला. मात्र त्यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, अशी भावना विनोद कांबळी याने व्यक्त केली आहे.

आचरेकर सरांनी संपूर्ण जीवन क्रिकेटसाठी ‍झिजवले. आचरेकर सरांनी आम्हाला जे दिले, त्याची परतफेड करण्यासाठी मी सिंधुदुर्गमधील ग्रामीण भागात खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण देईन. मला मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये खूप संधी आहे, मात्र प्रशिक्षणासाठी मी ग्रामीण भाग निवडल्याचे कांबळीने सांगितले.

Post a Comment

 
Top