पुणे- राष्ट्रवादीच्या खासदार नेत्या सुप्रिया सुळे यांनी कात्रज-उंद्री बायपास आणि बोपदेव घाटातील खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केले आहेत. #Selfieswithpotholes हा हॅशटॅग देऊन 'मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना?' असेही आवाहन केले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे #Selfieswithpotholes
अभियान सुरु सरकारवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की, ''हा पुण्यातला कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसर!!! राज्यातला एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत.! खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? सर्वत्र हेच चित्र असतांना आपले माननीय मंत्री महोदय Chandrakant Patil मात्र खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा अस आवाहन करताय... चला तर मग त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया.. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया. मी सुरुवात केली आहे, तुम्ही करताय ना?

सुप्रिया सुळे आज (बुधवार) पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. पुरंदर काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. हडपसर-नीरा महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक जणांचा हकनाक बळी गेला आहे. दोषींवर कारवाई व्हावी, ही मागणी गावकर्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आजपासून असहकार आंदोलन युनियन करणार आहे. त्यांनी सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांबाबत आपले म्हणणे मांडले.
Post a Comment