0
सावत्र बापाचा मुलीवर अत्याचार, नराधमाविरोधात गुन्‍हा दाखल

अमरावती- नराधम सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नागपूर येथे प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन स्थानिक नागपुरी गेट पोलिस ठाण्यात सावत्र बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद जमील वल्द युसूफ वेल्डर वय ५५ असे नराधमाचे नाव आहे. पिडीत महिलेच्या आईने चार ते पाच वर्षांपूर्वी दुसरा विवाह केल्या. त्यामुळे पिडीता आईबरोबर सावत्र बापाच्या घरी राहण्यास गेली. आई बाजारात गेली असता सावत्र बापाने मारहाण करीत अत्याचार केला. शिवाय कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर सावत्र बापाने अनेक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेच्या विवाहानंतर हा प्रकार तिच्या पतीच्या निदर्शनास आला. त्यानंतर या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदविला.

Post a Comment

 
Top