पुणे- एक सराईत गुन्हेगार चायनीजच्या दुकानावर येऊन दमदाटी करून पैशाची मागणी करत व फुकट जेवण करत असल्याच्या रागातून पाच जणांनी त्याचा दारू पाजून खून केला हाेता. त्यानंतर सुऱ्याने त्याच्या शरीराचे दाेन तुकडे करून पुरावा नष्ट करण्यासाठी कॅनाॅलच्या बाजूला दीड दिवस सदर मृतदेहाची शेकाेटी करून राख पाेत्यात भरून कॅनालमध्ये फेकून देण्यात अाली हाेती. याप्रकरणी पाच अाराेपींना पाेलिसांनी तब्बल दहा महिन्यांनंतर जेरबंद केले अाहे. विकी रमेश पाेताण (वय २२, रा. ढाेबळवाडी, वानवडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव अाहे.
विक्रम शेखर पिल्ले (वय २८, रा. पुणे), राजू शिवाप्पा नारायण नाईक (३४, रा. पुणे), संभू बाळकृष्ण थापा (२०, रा. घाेरपडी, पुणे), फारुक रफिक शेख (२६,रा. भवानी पेठ, पुणे) व शाहरुख सिकंदर शेख (२५, रा. पुणे, मुळ कारवार, कर्नाटक) अशी अाराेपींची नावे अाहेत. पुण्यातील बी. टी. कवडे राेडवरील कवडे पेट्राेलपंपावर दराेडा टाकण्यासाठी २८ अाॅक्टाेबर राेजी रात्री टाेळी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी या अाराेपींना अटक केली.

त्यांच्या ताब्यातून एअरगन, चार काेयते, मास्क, दाेरी, माेबाइल असा एकूण १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चाैकशी केली असता या अाराेपींनीच विकीचा जानेवारी महिन्यात खून केल्याचे उघड झाले.
मुख्य अाराेपीचा जॉकी ते खुनी प्रवास
मुख्य अाराेपी विक्रम पिल्ले याचे चायनीजचे दुकान हाेते. मृत विकी नेहमी हाॅटेलवर येऊन दमदाटी करून पैशाची मागणी करत हाेता. फुकट जेवण करत हाेता. त्या कारणावरून पाच अाराेपींनी नियाेजन करून त्याला हाॅटेलात जेवणास बाेलावले. तसेच दारू पाजून त्याचा खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याच्या मृतदेहाचे तुकडेही जाळले. अाराेपी विक्रम पिल्ले याचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला असून दाेन वर्षांपूर्वी त्याने चायनीजचे दुकान सुरू केले. त्यापूर्वी पी. सी. श्राॅफ व मल्लेश नरेशन कंपनीत ताे जाॅकी म्हणून काम करत हाेता. तिथे त्याला दीड लाख रुपये पगार हाेता. मलेशिया, इंग्लंड या देशांत ताे जाऊन अालेला अाहे. मात्र, उद्धट वर्तनामुळे त्यास कामावरून काढून टाकण्यात अाले हाेते.

Post a Comment