0
पाकिस्तानात शिक्षणाचे असले हाल, केवळ पोट भरण्यासाठीच जातात शाळेत
इस्लामाबाद - ही छायाचित्रे पाकिस्तानी हिल स्टेशनच्या एका मदरशाची आहेत. पाकिस्तानच्या शिक्षणाचे चित्र यावरूनच स्पष्ट होत आहे. देशातील 2 लाखांहून अधिक शाळा बंद झाल्या. जवळपास 2 कोटी मुले-मुली शाळेपासून वंचित आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांचा एकच हेतू असतो, तो म्हणजे पोट भरणे...
शिक्षणावर खर्च होतात 519 अब्ज रुपये
> इस्लामाबादपासून 30 किमी मुरे येथे अल-नवादा मदरसा आहे. या मदरशाने राष्ट्रात शिक्षणाचा विकल्प म्हणून यंत्रणा उभारली आहे. 
> या मदरशात राहणाऱ्या मुलांना दिवसातून तीनदा जेवण आणि शिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. 
> अल-नवादा मदरशाचे इरफान शेर यांनी सांगितल्याप्रमाणे, बहुसंख्य पालक आपल्या मुलांना शाळेत यासाठीच पाठवतात की किमान शाळेत मिळणाऱ्या जेवणातून फुकट लेकरांचे पोट भरू शकेल. 
> पाक सरकारच्या 216 च्या एका अहवालानुसार, देशभर 220,000 शाळा आहेत. तरीही पाकिस्तानची 2 कोटी मुले-मुली शाळेपासून वंचित आहेत. 
> पाकिस्तान सरकारने देशातील शिक्षण यंत्रणेत सुधारणांसाठी 2010 पासून शैक्षणिक बजेटमध्ये 15 टक्क्यांची वाढ करण्यास सुरुवात केली. 
> यूनाइटेड नेशन्सकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, पाकिस्तान सध्या आपल्या जीडीपीचा 2.65 टक्के शिक्षणावर खर्च करत आहे. 519 कोटींपैकी प्रत्येक विद्यार्थ्यावर 10 हजार रुपये खर्च करत आहे. एवढा खर्च होऊनही सरकारच्या अंमलबजावणीला आणि शिक्षकांना दोष दिला जातो.

Post a Comment

 
Top