0
विधवेला लग्‍नाचे अमिष दाखवून केला बलात्‍कार; तिच्‍या अल्‍पवयीन मुलीलाही केले शिकार

बीड-शहरातील मलकापूर भागातील एका विधवेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर बांधकाम मिस्त्रीने अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मिस्त्री वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना त्याला अटक केली आहे.

रबनवाज शरीफ बावजकर (२४) हा मिस्त्री काम करत असून त्याच परिसरात एक विधवा राहते. या चाळीस वर्षीय विधवेला बांधकामावर मजुरीचे काम देत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अामिष दाखवले. २०१३ पासून तो महिलेच्या घरी ये- जा करू लागला. यातूनच निर्माण झालेल्या जवळीकीतेचा गैरफायदा घेऊन त्याने परळी येथील महिलेच्या राहत्या घरी तसेच पुण्यातील हडपसर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केला. या प्रकरणी दोन्ही मायलेकींनी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रबनवाज बावजकर याच्यावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परळी शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, संग्राम सांगवे यांनी मिस्त्री रबनवाज याला अटक केली अाहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक हेमंत मानकर हे तपास करत आहेत.

Post a Comment

 
Top