0
Model Rashmi Shahabajkar alleges husband forced her to change religion latest update

मुंबई : मुंबईत एका मॉडेलनं आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केला आहे. पती धर्म परिवर्तनासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप मॉडेल रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात बांद्रा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रश्मी शहबाजकर यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी आसिफ शहबाजकरशी झाला होता. त्यावेळी त्यानं पत्नीला लग्नानंतरही तू हिंदूच राहशील, धर्मपरिवर्तनासाठी कुठलाही दबाव टाकण्यात येणार नाही, असं सांगितलं.
लग्नानंतरच्या काही वर्षांमध्ये मात्र आसिफनं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि नकार दिल्यानंतर बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित मॉडेल रश्मीनं केला आहे.
मुंबईतील बांद्रा परिसरातल्या न्यू गार्डन व्ह्यू बिल्डींगमध्ये रश्मी शहबाजकर राहतात. तिथूनही हाकलून लावण्याची धमकी पतीने दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जेव्हा रश्मींनी धर्मांतर केलं नाही, तेव्हा आसिफने दुसरं लग्न केलं आणि त्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं, असा दावा रश्मी यांनी केला आहे. दुसऱ्या पत्नीने धर्मांतर करत मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती आहे.
पोलिसांनी कलम 354, 509, 324, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस हे ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण तर नाही ना, याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

 
Top