हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) - पाच वेळी जागतीक विजेत्या एम.सी. मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तिने उत्तर कोरियाच्या किम हयांग मी हिला मात देत विक्रमी पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन ठरली. तिने एक वर्षानंतर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आशियाई स्पर्धेत इतिहास घडवत पाच सुवर्ण जिंकणारी मेरी कोम पहिली खेळाडू ठरली आहे.
या ३५ वर्षीय खेळाडूने ४८ किलो लाइट फ्लाइ वजनगटात उत्तर कोरियाच्या किम हयांगला ५-० गुणांनी एकतर्फी सामन्यात पराभवाची धूळ चारली. विशेष म्हणजे खासदार असलेल्या मेरीने पाच वर्षांनी आपल्या जुन्या ४८ किलो वजन गटात खेळत पदक जिंकले. मेरी कोमने यापूर्वी २००३, २००५, २०१० आणि २०१२ मध्ये आशियाई सुवर्ण जिंकले. आता तिची हे पाचवे सुवर्णपदक ठरले. तिला २००८ मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता भारताच्या सोनिया लाथेरकडून सुवर्णपदकाची आशा आहे. तिने उपांत्य फेरीत आक्रमक खेळाडू उजबेकिस्तानच्या योदगोरोय मिर्जाएवाला मात दिली आहे.
मेरी कोमचे वैशिष्ट्य : मेरी कोमच्या वैशिष्ट्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मेरी कोम बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचप्रमाणे मेरी कोम पाच वेळेची जागतिक विजेती आहे. आता पाच वेळेची आशियाई चॅम्पियनदेखील बनली. ती राज्यसभा खासदार आहे, ती पदक जिंकणारी पहिली खासदार ठरली आहे. ती सर्वात वरिष्ठ ३५ वर्षीय खेळाडू असून ती ३ मुलांची आई आहे. ती पती ओनलेर कोमच्या साथीने इंफाळमध्ये बॉक्सिंग अकादमी चालवते. ती सरकारी पर्यवेक्षक असल्याने बैठकांत सहभागी होते. मेरी कोमला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने २०१० मध्ये ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे नाव देऊन गौरवले.
माझे प्रत्येक पदक संघर्षाची कहाणी आहे : मेरी कोम
गेल्या एका वर्षात मी मैदानाबाहेर अनेक भूमिका पार पाडल्यानंतर आशियाई स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक माझ्यासाठी खास आहे. माझ्या सर्व पदकांच्या मागे नव्या संघर्षाची कहाणी आहे, असे मेरी कोमने मुलाखतीत म्हटले. मी खासदार झाल्यानंतर मिळवलेल्या पदकाने माझ्या उंचीत आणखी भर पडेल. आता मला आयआेसीच्या अॅथलिट समितीच्या बैठकीसाठी लुसानेला जायचे आहे. मला सारख्या प्रवासाचा कंटाळा आला असून मी थकून जाते. मात्र, आपल्या जबाबदारीपासून पळू शकत नाही, असे मेरी कोमने म्हटले.

Post a Comment