अजितगड (सीकर)-सीकर जिल्ह्यातील अजितगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुर्झा ग्रामपंचायत येथे सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. गावातील एका कुटुंबात दोन लग्ने लागली. रात्री दोन्ही मुलींनी सात फेरे घेतले. मात्र, आठ तासांनंतर एका नववधूला ताप चढला व त्यातच तिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दोन्ही मुलींची पाठवणी होणार होती. त्याऐवजी एकीची डोली निघाली, तर दुसरीची अंत्ययात्रा सुरू झाली.
कुटुंबीयांनी अश्रुभरल्या डोळ्यांनी मोठ्या बहिणीची डोलीतून पाठवणी केली, तर दु:खावेगाने लहानीची अंत्ययात्रा काढली. बुर्झा येथील ढाणी निवासी कजोडमल बलाई यांच्या दोन मुली कौशल्या (२१) व संतोष (२०) यांचा शुभविवाह रविवारी चिमणपुरा येथील बाबुलाल बलाई यांचा मुलगा विक्रम व विनोद यांच्याशी झाला. लग्नाचे सर्व विधी पार पडले. दोन्ही मुलींची लग्ने एकाच मांडवात होत असल्याने कुटुंबात व नातेवाइकांत आनंदाचे वातावरण होते. रात्री सात फेरे झाल्यानंतर लहानी मुलगी संतोषची प्रकृती अचानक बिघडली. तिला अजितगड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषचे निधन झाल्याची वार्ता आली आणि गावात शोककळा पसरली. कजोडमल यांनी कशीबशी मोठ्या मुलीची कौशल्याची पाठवणी केली. त्यानंतर संतोषचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला. नववधूच्या पेहरावात संतोषची अंत्ययात्रा काढण्याचा दु:खद प्रसंग ओढवला.
चार मुलींमध्ये सर्वात लहान होती नववधू संतोष
कजोडमल यांना चार मुली व दोन मुले आहेत. ते वीटभट्टीवर काम करून घर चालवतात. मोठ्या दोन मुलींची लग्ने झालेली होती. संतोष सर्वात लहान होती. तिच्या लग्नाची तयारी झाली. लग्नासाठी सर्व तयारी पूर्ण झाली. संतोषच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. संतोषचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता.

Post a Comment