0
आई-बापानेच केले मुलीसोबत गैरकृत्य, दारू पाजून करायला लावायचे असे काम
कुरूक्षेत्र- नाबालिक मुलीला जबरदस्ती दारू पाजून अनैतिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपी आईला आणि सावत्र बापाला कोर्टाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र एवं न्यायाधीश मधु खन्ना लाली यांच्या कोर्टाने दोघांना 10 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 50-50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जुर्माना न भरल्यास दोघांना आणखी एक वर्ष शिक्षा भोगावी लागणाऱ आहे.

आई आणि सावत्र बाप पैशांसाठी करत होते हे... 
1 मार्च 2016 रोजी महिला पोलिस ठाण्यात आई सीमा आणि सावत्र बाप मोहनलालविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 16 वर्षीय नाबालीक मुलीने तक्रारीत म्हटले होते, तिची आई आणि सावत्र बाप पेशांसाठी तिला अनैतिक काम करायला लावतात. तिला जबरदस्ती दारू पाजली जाते. तिने अनैतिक काम करण्यास विरोध करताच तिला मारहाण करण्यात येते.

एक दिवस कशीतरी ती त्यांना चुकवून आपली आंटी अंजूकडे पोहोचली. तिथे तिने सर्वकाही सांगितले. त्यानंतर अंजूला घेऊन ती महिला पोलिस ठाण्यात पोहोचली. तीच्या तक्रारीवरून आई सीमा आणि सावत्र बाप मोहन लाल यांच्या विरोधात पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौकशी दरम्यान पीडित मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यानंतर एडीजे मधुखन्ना यांनी सीमा आणि मोहनलाल यांना दोषी ठरवत दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.

Post a Comment

 
Top