0
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या घरी दोन लाखांची चोर झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. चिरंजीवी यांच्या घरात झालेल्या चोरीची तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आरोपीला अटक केली. या अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या चेन्नैया या नोकरानेच चोरी केली असून, त्याने पोलिस चौकशीत एक मोठा खुलासाही केला आहे.
चेन्नैया गेल्या दहा वर्षांपासून चिरंजीवी यांच्या घरात काम करत असून, त्याच्यावर अनेकांचाच विश्वास होता. घरातील वस्तूंची नेमकी जागा कुठे असते, इथंपासून ते पैसे ठेवण्याच्या जागेपर्यंत सर्व काही चेन्नैयाला ठाऊक होते. पण, त्याच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी कधीही त्याच्यावर चिरंजीवी यांच्या कुटुंबीयांकडून संशय घेण्यात आला नाही. पण, चेन्नैयाने मात्र या विश्वाचा गैरफायदा घेत आपल्याच मालकाच्या घरात चोरी केली.

Post a Comment

 
Top