0
हार्दिक पंड्याच्या त्या चुकीने आशिष नेहरा नाराज

नवी दिल्ली : वन डे सीरिजमध्ये २-१ ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीच्या फिशोजशहा कोटला मैदाना पहिला टी-२० सामना झाला.
या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत पहिल्यांदाच न्यूझीलंडला टी-२० मध्ये मात दिली. हा सामना आशिष नेहरासाठी शेवट्चा ठरला. त्यामुळे सर्वांना हा सामना जिंकायचा होता. झालेही तसेच. 
टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकीय खेळींच्या मदतीने २० ओव्हर्समध्ये २०२ रन्स केलेत. न्यूझीलंडला विजयासाठी २०३ रन्सची गरज होती. २०३ रन्स पाठलाग करत टीम इंडियाला दुस-याच ओव्हरमध्ये विकेटचा फटका बसला. चहलने मार्टिन गप्टिलला पांड्याच्या हातून कॅच आऊट केले. 
दरम्यान, प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की, त्याचा शेवटचा सामना यादगार व्हावा. पण हार्दिक पंड्याच्या एका चुकीमुळे आशिष नेहरा चांगलाच नाखूश झाला. टीमकडून तिसरा ओव्हर फेकण्यासाठी आलेल्या नेहराच्या पाचव्या बॉलवर मनरोची कॅच पंड्याने ड्रॉप केली. तशी ही कॅच सोपी नव्हती, पंड्याने प्रयत्नही केला. पण कॅच घेऊ शकला नाही. त्यामुळे आशिष नेहराची शेवटच्या मॅचमध्ये विकेट घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली. 

Post a Comment

 
Top