0
पाच हजार रूपयांची लाच मागणारा पोलिस जाळ्यात

नगर- हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात मालक त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला नाही, याचे बक्षीस म्हणून हजारांची लाच मागणारा तोफखाना ठाण्याचा पोलिस शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. संजय बबन काळे असे त्याचे नाव असून न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळील बॉम्बे टी सेंटरजवळ त्याला अटक झाली.

हॉटेलवरील छाप्यात दारु सापडली होती. याप्रकरणी हॉटेलमधील कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मालक त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला नाही, याचे बक्षीस म्हणून काळे लाच मागत होता.

जि.प. लिपिकही ताब्यात
निवृत्तमुख्याध्यापकाच्या मंजूर रजा रोखीकरणाचे बिल देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जि. प. वेतन भविष्य निर्वाह निधी विभागातील वरिष्ठ लिपिक सुनील दादू सोनवणे याला बुधवारी अटक झाली. नेवासे तालुक्यातील चांदा येथील जवाहर विद्यालयाचा लिपिक सुनील हरिभाऊ साबळे याच्यामार्फत त्याने ही लाच घेतली होती.

Post a Comment

 
Top