
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं त्यांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पाटीदार अनामत आंदोलन समिती म्हणजेच हार्दिक पटेलच्या गटाला फक्त दोनच तिकीटं देण्यात आली. २० तिकीटांची मागणी केल्यावरही दोनच तिकीटं मिळाल्यामुळे हार्दिक पटेलची संघटना नाराज झाली आणि संतप्त पाटीदार कार्यकर्त्यांनी काँग्रेसची अहमदाबाद आणि सुरत मधील कार्यालयं फोडली.
या सगळ्या राड्यानंतर हार्दिक पटेलनं नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं,निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा.’अशी कविता हार्दिक पटेलनं ट्विटरवरून शेअर केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ही कविता आहे.
आज बाजपेईजी की दो पंक्ति याद आ गई,
बाधाएँ आती है आएगी,धिरे प्रलय की घोर घटे,पाँवों के नीचे अंगारे,सिर पर बरसे यदि ज्वालाएँ,निज हाथो में हँसते हँसते,आग लगाकर जलना होगा,क़दम मिलाकर चलना होगा ।।
Post a Comment