0


सिरसा- दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमच्या मुलाने डेरा सच्चा सौदा प्रमुख बनण्यास नकार दिला आहे. मंगळवारी गुरमीत राम रहीम याचा मुलगा जसमीत याने एक वक्तव्य जारी केले. त्यात त्याने म्हटले आहे की, या पदाची माझी कधीही इच्छा नव्हती. मी कधीही याचा विचार केला नाही. माझे वडील निर्दोष आहेत. आम्हाला हायकोर्टात न्याय मिळेल. बाबा लवकरच जेलमधून बाहेर येतील आणि डेरा प्रमुखाचे पद स्वीकारतील.
जसमीतच्या वक्तव्यात आणखी काय?
- जसमीतने तो डेरा प्रमुख होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने जारी केले आहे. पण त्याच्या या वक्तव्यानंतर डेऱ्याची जबाबदारी आता कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- जसमीतने म्हटले आहे की, डेऱ्यामुळे 25 ऑगस्ट रोजी ज्या घटना घडल्या त्या दु:खदायी होत्या. यातील निर्दोष लोकांबद्दल माझी सहानुभूती आहे. या दु:खातुन मी अजुनही बाहेर पडु शकलेलो नाही.
हायकोर्टाकडून न्यायाची अपेक्षा
- जसमीतने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 1948 में शाह मस्ताना महाराजांनी डेऱ्याची स्थापना केली. त्यानंतर संत शाह सतनाम महाराजांना याची जबाबदारी सोपविण्यात आली. शाह सतनाम महाराजांनी 1990 मध्ये गुरमीत राम रहीम सिंह इन्सान यांच्यावर डेऱ्याची जबाबदारी सोपवली.
- तेव्हापासून डेऱ्याकडून आध्यात्मिक आणि मानवतावादी कार्य करण्यात येत आहे. माझे वडील खरे आणि निर्दोष आहेत. मला अपेक्षा आहे की हायकोर्ट त्यांना न्याय देईल. गुरमीत राम रहीम हेच डेरा सच्चा सौदाचे प्रमुख आहेत आणि राहतील.
विपासना करत आहे डेऱ्याचे व्यवस्थापन
- साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम 25 ऑगस्ट रोजी दोषी ठरविण्यात आले. त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याचे पुर्ण कुटूंब फरार झाले होते.
- त्यानंतर विपासना ही डेऱ्याचे व्यवस्थापन पाहत आहे. तिला दम्याचा आजार आहे. काही दिवसांपूर्वी राम रहीमचे कुटूंब डेऱ्यात परतले. त्यानंतर राम रहीमचा मुलगा जसमीत डेऱ्याची जबाबदारी सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण मंगळवारी जसमीतने याचा इन्कार केला. 

Post a Comment

 
Top