0
crack on railway track near Matunga Station Central Railway disrupted latest update

मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. तसेच कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या फास्ट ट्रॅकवरील लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत.
सध्या रेल्वेकडून दुरुस्तीचं काम सुरु असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. मध्य रेल्वेवर वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये मात्र बरीच नाराजी आहे.

Post a Comment

 
Top