0

अकोला : छत्तीसगड येथून आलेला आणि गोवा येथे जात असलेला ‘रेक्टीफाईड आरएस’ नावाचा दारूमध्ये वापरण्यात येत असलेल्या स्पिरिटचा साठा असलेला टँकर बुधवारी दुपारी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर पकडण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. 
छत्तीसगढ येथील के. ए. ०१ बी ६०८१ क्रमांकाचा रेक्टीफाईड स्पिरिटचा एक टँकर तब्बल एक हजार लिटर स्पिरीट घेऊन जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुर्तिजापूर ते अकोला या दरम्यान पाळत ठेवली, सदर ट्रक हा मूर्तिजापूर जवळील एक ढाब्यावर असल्याची माहीत मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ट्रक जप्त केला. ट्रक मधील चालक आणि क्लीनर या दोघांची त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही तामिळ असल्याने त्यांना हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषा कळत नव्हती, या अडचणीमुळे उत्पादन शुल्क विभागाने दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले, भाषा न समजल्याने सदर ट्रक कुणाच्या मालकीचा आहे, स्पिरिट कुणाचे आहे हे समोर आले नाही. उत्पादन शुल्क विभागाने तामिळ भाषा समजणारा आणि त्याचे मराठी किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणाºयांचा शोध सुरू केला आहे.  या दोघांची तामिळ भाषेत चौकशी केल्यानंतर सदर प्रकरणाचा भांडाफोड होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी दिली.

चालक व क्लीनर तामिळ भाषिक
चालक आणि क्लीनर दोघेही हिंदी भाषिक आहेत, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला अधिक माहिती मिळाली नाही, तामिळ भाषेचा ट्रान्सलेट करणारा व्यक्तीचा शोध घेऊन या प्रकरनाचा उलगडा करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.
यापूर्वीही मुर्तीजापूरात पकडले होते स्पिरिट
पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी २०१४ मध्ये स्पिरिटचा ट्रक पकडला होता, यामध्ये अकोल्यातील बड्या दारू माफियांचा सहभाग असल्याचेही समोर आले होते, मात्र त्यानंतर सर्वच स्तरावर हे प्रकरण 'मॅनेज' करण्यात आले होते, या संदर्भात चांगलीच चर्चा झाली, मात्र ठोस कारवाई झाली नव्हती हे विशेष.

Post a Comment

 
Top