
कोलकाता-भारत आणि श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. शेवटच्या दिवशी कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या (नाबाद १०४) बळावर भारताने ८ बाद ३५२ धावांवर दुसरा डाव घोषित केला. नंतर ७५ धावांवरच श्रीलंकेचे ७ गडीही बाद केले. मात्र, अंधुक प्रकाशाच्या कारणामुळे पंचांनी खेळ थांबवला. दोन्ही डावांत ८ बळी घेणारा भुवनेश्वर सामनावीर ठरला.
> हाशिम अामलाच्या विक्रमाशी केली बरोबरी, कोलकाता कसोटी अनिर्णीत
>५० शतके विराटने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत झळकावली. अशी कामगिरी करणारा तो सचिननंतर दुसरा भारतीय. सर्वात कमी (३४८) डावांत ५० शतके झळकावण्याच्या हाशिम आमलाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
> १८ वे कसोटी शतक विराटचे. श्रीलंकेविरोधात तिसरे आणि ईडन गार्डनवर पहिलेच शतक.
> ११ वे शतक कर्णधार या नात्याने. सुनील गावसकरांच्या या भारतीय विक्रमाची विराटने बरोबरी साधली.
> ५ ही दिवस (सामन्यात) फलंदाजी करणारा पुजारा तिसरा भारतीय आणि जगातील नववा खेळाडू ठरला आहे.
Post a Comment