0


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. माझी बदनामी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे, असा दावा त्याने केला आहे.

राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात हार्दिक पटेलनेही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्यासाठी भाजपने बनावट सेक्स सीडी तयार केली आहे. मतदानाआधीच ती प्रसिद्ध केली जाईल. भाजपकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो? त्यामुळे केवळ पाहा आणि आनंद घ्या, असे तो म्हणाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी हार्दिकच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

Post a Comment

 
Top