0
अभिनेत्री माधवी जुवेकरच्‍या नृत्‍यावर बेस्‍ट कर्मचा-यांनी उधळल्‍या नोटा, व्हिडिओ व्‍हायरल
मुंबई - अभिनेत्री आणि बेस्टची कर्मचारी माधवी जुवेकरच्या नृत्यावर बेस्टचे कर्मचारी नोटांची उधळण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिले आहेत. वडाळा आगारामध्ये हा कार्यक्रम होऊन सव्वा महिना उलटला आहे. पण आता एवढ्या दिवसांनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
दसऱ्यानिमित्त वडाळा विभागात बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बेस्टची कर्मचारी माधवी जुवेकरही सहभागी झाली होती. मेळाव्यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. देशभरातील विविध नृत्यशैली अशा संकल्पनेवर तिथे कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गरबा, जोगवा हेदेखील होते. पण कच्छी नृत्य करत असताना काही बेस्ट कर्मचाऱ्यांनी माधवी जुवेकर अजून एक महिला कर्मचारी नृत्य करत असताना त्यांच्यावर पैसे उधळले. माधवी जुवेकरने तोंडात नोटा धरल्या होत्या हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यासंदर्भात माधवीशी ‘दिव्य मराठीने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.


Post a Comment

 
Top