0
ब्युटी पार्लर चालवणाऱ्या विवाहितेची आत्महत्या

तीर्थपुरी- ब्युटी पार्लर चालवित असलेल्या महिलेने राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथे ३० ऑक्टोबर रोजी घडली. रेणुका अशोक तोतला (३३) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हलाखीच्या परिस्थितीत ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

 
Top